महिलांच्या कर्तृत्त्वाचा आलेख (परिचय)

  • अंजली विवेक जोशी


रेल चाइल्ड संस्था, सरस्वती मंदिर येथे २४ वर्षे कार्यरत असणाऱ्या अंजली जोशी यांनी डी. एड. व बी. ए. पूर्ण केले आहे. तसेच योगशिक्षणाचा अभ्यासक्रमही पूर्ण केला आहेविद्यार्थ्यांना शिकविताना खेळ, कथाहस्तलिखिते यांच्या माध्यमातून त्या नवनवीन प्रयोग करून शिकवित असतात. विद्याथ्याप्रमाणेच जनसामान्यांमध्ये योगविषयक जाणीव निर्माण व्हावी यासाठी त्या प्रयत्नशील असतात. त्या जम्प रोप कोच असून त्यांनाही त्यासाठी पुरस्कारही प्राप्त झाला आहे. अक्षरमंच सामाजिक सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या कल्याणातील नामवंत संस्था याज्ञवल्क्यच्या त्या सक्रीय सदस्या असून विविध सामाजिक सांस्कृतिक व शैक्षणिक उपक्रमांमध्ये त्यांचा सहभाग असतो. त्यांना लिखाणाची आवड असून विविध कविता व लेख विविध वृत्तपत्रे आणि दिवाळी अंकातून प्रकाशित झाले आहेत. त्यांच्या विविधांगी कार्याबद्दल त्यांना राजमाता जिजाऊ पुरस्कार, पुण्यनगरी कडून आदर्श शिक्षिका पुरस्कार व महिला दिनाचे निमित्ताने भरारीरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.



  • साक्षी शंकर परब


संकल्प इंग्लिश स्कूलचे संचालक डॉ. शंकर परब व मख्याध्यापिका डॉ. ज्योती परब यांची कन्या म्हणजे साक्षी परब हिने दहावीपासन आपली स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यास सुरूवात केली. दहावीमध्ये ९९ टक्के तर बारावीमध्ये ९४ टक्के गण पटकावून तिने उच्च माध्यमिक शालांत परीक्षेमध्ये महाराष्ट्रात प्रथम येण्याचा मान पटकाविला. आज ती कला शाखेत द्वितीय वर्षात प्रशिक्षण घेत आहे तसेच योग प्रशिक्षाणातही पदवी व पदविका अभ्यास करीत आहे. त्याचप्रमाणे ती योग शिक्षिका म्हणूनही कार्य करीत आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या चरित्र वाचनाने प्रभावित होऊन तिने तलवारबाजीचे शिक्षण घेतले आहे व राज्यस्तरीय तलवारबाज खेळाडू म्हणून तिचा लौकिक आहे. उत्कृष्ठ अभिनय व गायिका म्हणनही ती ओळखली जाते. १० वी बिनधास्त या यु " 3 ट्यूब सिरीजद्वारे ज्येष्ठ साहित्यिका डॉ. विजयाताई वाड आणि लेखिका माधुरीताई घारपुरे यांच्यासोबत तिने मार्गदर्शन केले आहे. लहान वयातच तिची दहा पुस्तके प्रकाशित झाली असन ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर, अमिताभ बच्चन, महामहिम प्रतिभाताई पाटील, मा. मनोहर जोशी यांनी तिचे कौतुकही केले आहे. ठाणे विशेष महापौर पुरस्कारासहित मात अनेक नामवंत संस्थांचे पुरस्कार तिला प्राप्त झाले आहेत. •



  • अर्चना पाटील


अर्चना पाटील इंग्रजीची लेक्चरर म्हणन काम करीत होत्या. लग्न म्हण झाले. सर्व व्यवस्थित सुरू होते आणि त्यावेळी मलीचा जन्म झाला पण लवकरच लक्षात आलं त्यांची मुलगी रश्मी कर्णबधीर आहे. त्यानंतर दोन अडीच वर्षातच मुलाचा जन्म झालावर्षभरानंतर निदान झालं की जतिन ऑटीस्टीक आहे. हे ऐकून त्यांना जबरदस्त धक्का बसला. आता मुलांना मोठं करणं, घडविणं हे मोठं चलेंज दिल मलांसाठी दिला होतं. त्यांनी जॉब सोडला आणि “ इथूनच त्यांच्या कठोर मेहनतीला सुरूवात रूवात झाली. रश्मीला त्यांनी भायखळा येथल्या विशेष शाळेत सॅन्डहस्ट रोड इथून गाडी बदलून घातले. रोज पनवेलहून ट्रेनने भायखळा स्टेशन व नंतर शाळा असा प्रवास मुलीसाठी तिची भाषा पेरेन्टल गायडन्सचा कोर्स करून शिकून त्याप्रमाणे तिला शिकविणंमुलांसाठी स्पेशल माम आणि टीचर बनणं, प्रचंड मेहनत करून त्यांनी मुलांना घडविलं. मुलगी रश्मी भरतनाट्यमच्या सहा परीक्षा डिस्टींक्शनमध्ये उत्तीर्ण झालीशिक्षण आणि त्यानंतर हॅण्डमेड ज्वेलरीचा ऑनलाईन व्यवसाय करते. मुलगा जतीन याने राष्ट्रीय शिष्यवृत्ती मिळविली आहे. महाराष्ट्र प्रज्ञा शोध परीक्षा यामध्ये तो १२ वा आला तर डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले. आय आय टी जेई आज Indian Institute of अॅडव्हान्स परीक्षेत १६ वा आला. science मध्ये तो संशोधनपर शिक्षण घेत आहे. या दोन्ही मुलांना घडवून त्यांची र समाजात वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या अर्चना पाटील यांना सु सन्मानित करण्यात आले आह



  • वैशाली नरेश कांदळगावकर


वैशाली कांदळगावकर मूळच्या मुंबईच्या. वडील रेल्वेमध्ये पण घरची परिस्थिती बेताचीच. बारावी नंतर शिक्षिका होण्यासाठी त्यांनी डी. एड. ला प्रवेश घेतला. पण परिस्थितीमुळे शिक्षण सोडून नोकरी करावी लागली. नोकरी करत त्यांनी बी. कॉम., बी. ए., एम. ए. तसेच सॅनिटरी इन्स्पेक्टर व योग शिक्षकाचा अभ्यासपूर्ण (कोर्स) पूर्ण केला. लग्नानंतर कल्याण येथे आल्यावर प्रापंचिक जबाबदाऱ्यांमुळे नोकरी सोडावी लागली. पण स्वस्थ बसणे त्यांना मानवणारे नव्हते. त्यांनी घरच्या घरी शिकवणी वर्ग सुरू केले. प्रचंड मेहनत व शिकविण्याची हातोटी या जोरावर त्यांनी दोन विद्यार्थ्यांपासून सुरू केलेल्या क्लासमध्ये आजमितीस वर्षाला १००० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तसेच पाच ठिकाणी श्रध्दा क्लासेसचा शाखाविस्तारही झाला आहे. क्लासेसच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी करियर गायडन्सपसर्नल कौन्सिलिंग, अॅप्टिट्यूड टेस्ट, शैक्षणिक सहली, स्नेहसंमेलन असे अनेक उपक्रम राबविले जातातत्यांच्या व्यक्तिमत्वाचा अजन एक वेगळा पैलू म्हणजे आम्ही उद्योगिनी या संस्थेच्या माध्यमातून महिला व्यावसायिकांसाठी त्या कार्य करीत आहेत. मीनलताई मोहाडीकर यांनी कल्याण शाखेची जबाबदारी वैशाली कांदळगावकर यांना सोपविलीशाखेच्या माध्यमातून महिला उद्योजकांना विविध प्रकारचे मार्गदर्शन, सरकारी योजनांची माहिती, मार्केटिंग, तंत्र शिकवले जाते. त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळावी म्हणून प्रदर्शनांचे आयोजन केले जातो. आम्ही उद्योगिनीतर्फे त्या दुबईला गेल्या होत्या. तेथील चेंबर ऑफ कॉमर्समार्फत महिला उद्योगिनींची उत्पादने दुबईत विकण्याची योजना अमलात येत आहे.



  • ट्विंकल दिपक वीरा


व्याक्तीमत्वाची उंची शारीरिकतेवर नसून कर्तृत्वावर अवलंबून असते हे अवघी तीन फूट उंची असलेल्या टिवकल वीरा यांनी आपल्या कर्तृत्वातून साध्य करून दाखविले आहे. ओंकार लिमिट इंग्लिश मिडियम स्कूलमधून दहावी पूर्ण केल्यानंतर त्यांनी प्रगती कॉलेज आजार ऑफ आर्टस् मधून बीएमएस पदवी घेतली. विशेष म्हणजे पाचही वर्षे त्या प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या व स्कॉलरशिपही मिळवली होती. त्यानंतर एमबीए पूर्ण करून त्यांनी रेडीमेड गारमेंटसच्या व्यवसायात वडिलांसोबत कार्य करण्यास वात केली. कपडे उत्पादन ते मार्केटिंग सर्व जबाबदाऱ्या त्यांनी लिलया पेलण्यास सुरूवात केली. व्यवसाय म्हटला की फिरस्ती आलीच त्यानुसार त्यांनी स्वतः गाडी शिकून घेतली. गाडी शिकताना आपल्या तीन फूट उंचीचा कोठेही अडथळा । येऊ नये याची पूर्ण मानसिक तयारी त्यांनी केली आणि केवळ सहा दिवसातच पूर्ण गाडी शिकून त्या पारंगत झाल्या. १०० कामगार असलेली त्यांची फॅक्टरी त्या सहजपणे सांभाळतात. बिझनेस वूमन हा ठसा त्यांनी अल्पावधीत जनमानसात रूजविला. या गोष्टी करीत असताना आपली फोटोग्राफी, भटकंती, म्युझिक, पियानो वादन ही आवडसुध्दा त्या आवर्जून जपत असतात आणि त्यासाठी वेळसध्दा देत असतात. त्यांच्या रुटस्टॅडींग परफॉमन्ससाठी धीरूभाई अंबानी फाऊंडेशनच्या वतीने नीताताई अंबानी यांच्या हस्ते त्यांना स्कॉलरशिप व सन्मानही प्राप्त झालेला आहे.



  • अजिता भूषण घोडगावकर


कॉम्प्युटर सायन्स मधून बी. एस्सी. केलेल्या अनिता निरंतर- घोडेगावकर यांनी काही काळ नोकरी केल्यानंतर आपल्या आवडत्या अभिनयाच्या क्षेत्राकडे त्या पुन्हा वळल्या. शाळा, महाविद्यालयात असताना वक्तृत्व, कथाकथन आणि एकपात्री नाट्य अभिनय अशा तिहेरी प्रवास सरू होता. गो. ह. देशपांडे, सुधाताई गद्रे, के. के. वाघ शिक्षण संस्थांमधील अनेक वक्तृत्व स्पर्धांमध्ये त्यांनी पारितोषिके पटकावली तसेच सलग तीन वर्षे गावकरी करंडक ही कथाकथन स्पर्धा त्यांनी जिंकली. स्व. पद्माबाई कोटेच्या स्मृती राज्यस्तरीय एकपात्री अभिनय स्पर्धा, अखिल भारतीय साहित्य परिषद न्यास, अखिल भारतीय सांस्कृतिक संघ, बालभवन आयोजित बालनाट्य स्पर्धा उत्कृष्ठ अभिनय स्पर्धा सलग तीन वर्षे सकाळ करंडक एकांकिका स्पर्धा, थिएटर अॅकॅडमी रंगसंगीत एकांकिका स्पर्धा अशा अनेक स्पर्धांमधून अजिता यांनी पारितोषिके पटकावली आहेत. राष्ट्रसेवा दल, अध्यापक विद्यालय, सिन्नर, अंकुर कला केंद्र, के. जे. मेहता हायस्कूल व इ वाय फडोळ ज्यनियरा कॉलेज येथे विद्यार्थ्यांना संभाषण, वाक्चातुर्य शब्दफेक, अभिनय कौशल्य, कथाकथन आदी विविध विषयांवर त्यांनी मार्गदर्शन केले आहे. ८२ व्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनात साभिनय कवितांचे सादरीकरण, तुझ आहे तुजपाशी या व्यावसायिक नाटकात अभिनय त्यांनी केला आहे. स्वामी विवेकानंद यवा सेवा संस्था तर्फे राज्य यवा गौरव पुरस्कार, राष्ट्रीय कला अकादमीच्या वतीने रंगभूमी दिन पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. .