कल्याण प्रतिनिधी : देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघ, कल्याण संचालित लक्ष्मी नारायण वधुवर नोंदणी केंद्र आयोजित राज्यस्तरीय सकल ब्राह्मण वधुवर पालक परिचय मेळावा दिनांक १ मार्च रोजी बालक मंदिर संस्थेचे कॅप्टन ओक हायस्कूल सभागृह, दत्त आळी, टिळक चौक, कल्याण पश्चिम येथे सुनियोजित पध्दतीने पार पडला. या मेळाव्यास महाराष्ट्रातील सर्व भागातील १२० ब्राह्मण वधुवर पालकांनी उपस्थिती लावली. सकाळी १० वाजता श्री गणेशास पुष्पहार व दीपप्रज्वलन मान्यवर समुपदेशक अॅडव्होकेट महेश जोशी, डोंबिवली, ज्योतिषाचार्य माधवी जोशी, कल्याण, संस्थाध्यक्ष सुरेश कुळकर्णी इतर कार्यकारिणी सदस्य यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर मुख्य कार्यक्रमास सुरूवात झाली. यावेळी मान्यवरांचे व उपस्थितांचे स्वागत करण्यात आले. यावेळी अध्यक्ष सुरेश कुळकर्णी यांनी अॅड. महेश जोशी यांना पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. प्रथम प्रास्तविक व मेळाव्याचे उद्दिष्ट याबाबत माहिती सर्व उपस्थितांना अॅड. मंदार कुलकर्णी यांनी करून दिली. या अगोदर असाच मेळावा २०१६ साली आपल्या संस्थेतर्फे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळीही उत्तम प्रतिसाद मिळाला होतासंस्थेच्या इतर उपक्रम याबद्दलची माहिती पण देण्यात आलीत्यानंतर अॅड. महेश जोशी यांचा परिचय वृषाली वरूडकर यांनी कूरून दिला. प्रथम सत्राची सुरूवात ॲडमहेश जोशी, डोंबिवली यांनी केलीत्यांनी विवाह म्हणजे कायआताच्या काळात येणाऱ्या अडचणी, पालकांच्या अपेक्षावधुवर यांच्या अपेक्षा यावर त्यांनी प्रकाशझोत टाकला. त्यांनी वधुवर व पालकांनी आपणास कसा जोडीदार हवाच व निवडताना घेण्याची काळजी, तसेच काही बाबतीत तडजोड करणं आवश्यक आहे हे वधुवरांच्या मनावर बिंबवलेत्यांनी विवाहपूर्व समुपदेशन खुमासदार शैलीत मार्गदर्शन तसेच सुसंवाद साधला. त्यांनी वधुवर पालकांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. त्यांच्या मार्गदर्शनाबद्दल डॉ. वैजयंती पतकी यांनी आभार मानले. यानंतर दुसरे समुपदेशन मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर अद्वैत पाध्ये यांना मंचावर आमंत्रित करण्यात आले. त्यांचा परिचय अॅड. संपदा कुळकर्णी यांनी करून दिला. त्यांचाही पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन यथोचित सन्मान वधुवर केंद्र चालक विजय चाव्हरे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यांनी आपल्या स्लाईडशोच्या माध्यमातून विवाह म्हणजे काय..आता शुभ विवाह हा सोहळा राहिला नसून तो इव्हेंट झाला आहे. त्यानंतर त्या प्रत्येक गोष्ट खुलासा करून सहजीवनाची महती मांडली. सहजीवनाची सुरूवात हा विषय सुलभ पध्दतीने वधुवर पालक यांच्या समोर सादर केला. त्यांच्या या अमूल्य मार्गदर्शनाबद्दल अॅड. संपदा कुळकर्णी यांनी आभार मांडले. यानंतर सर्वांनी सुग्रास भोजनाचा आस्वाद घेत एकमेकांशी संवाद साधला. दुपारच्या सत्रात प्रथम उपस्थित वधुवर पालक परिचय करून देण्यात आला. त्यांच्याशी संवाद अॅड. संपदा कुळकर्णी, वृषाली वरूडकर, डॉक्टर वैजयंती पतकी यांनी प्रश्नोत्तराद्वारे साधला. शेवटी ज्योतिषाचार्य माधवी जोशी यांना मंचावर आमंत्रित केले. त्यांचाही पुष्पगुचछ व भेटवस्तू देऊन सन्मान संस्था अध्यक्ष सुरेश कुळकर्णी यांनी केला.
ब्राह्मण वधू-वर पालक परिचय मेळावा संपन्न
• VISHWAS KULKARNI