'सक्षम' अर्थात् 'समदृष्टी क्षमता विकास एवं अनुसंधान मंडल' या संस्थेतर्फे दिव्यांगांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी कार्यरत असलेल्या अखिल भारतीय संस्थेतर्फे दिव्यांगांसाठी अनेक उपक्रम राबविले जात असतात. धार्मिक, ऐतिहासिक महत्त्वाच्या ठिकाणांची दिव्यांगांना सहल घडवून त्यांना त्या त्या ठिकाणांची प्रत्यक्ष अनुभूती मिळवून देणे हाही 'सक्षम' हाती घेत असलेल्या उपक्रमांचाच एक भाग होय. या उपक्रमांतर्गत आतापर्यंत कावनई, टाकेद, रायगड आणि कळसूबाई शिखर अशा काही ठिकाणांना दिव्यांगांसह भेट देण्याचे उपक्रम संस्थेच्या नाशिक शाखेने यशस्वीपणे पार पाडले आहेत. त्यात दृष्टिबाधित, गतिमंद, श्रवणबाधित आणि अस्थिबाधित दिव्यांग व्यक्तींचा समावेश आहे.
'सक्षम'च्या या उपक्रमांतर्गत 'क. अंजना प्रधान' या 'सक्षम' संस्थेची सदस्या असलेल्या अस्थिबाधित दिव्यांग तरूणीने महाराष्ट्रातील सर्वात उच शिखर (५,४०० फूट) असा लौकिक असलेल्या कळसूबाई शिखरावर कमीत कमी कालावधीत अकरा वेळा चढाई करून एक विक्रम करण्याचा संकल्प केलेला असून प्रत्येक आठवड्यात एकदा, अशा रीतीने आतापर्यंत दहा वेळा कळसूबाई शिखरावर यशस्वी चढाई करून संकल्पपूर्तीच्या दिशेने पावले उचचली आहेत. या मोहिमेचा हा वेग लक्षात घेता येत्या मार्च महिन्यात अंजनाचा हा संकल्प पूर्णत्वास जाईल याबद्दल खात्री दता येऊ शकते. दि. २६/२/२०२० रोजी कु. अंजनाच्या याच उपक्रमाचा एक भाग म्हणून कळसूबाई शिखरावर ती आणि आणखी दोन विकलांगांसह चढाईची योजना आखण्यात आली होती. अंजनाच्या या सहलीत 'कु. छोटी चव्हाण' अस्थिबाधीत दिव्यांग्र तरुणी (वय ३५ वर्षे) व सेरेब्रल पाल्सी व्याधिबाधित अशा 'चि. रूद्र बलकवडे (वय १५ वर्षे) या दिव्यांग बाल सदस्याचा समावेश होता. | या तरूणीचे दोन्ही पाय बाधित असून तिला दोन्ही हाती कुबड्या घेऊनच आपले सर्व व्यवहार पार पाडावे लागतात. अशी प्रतिकुल परिस्थिती असूनही कु. छोटी चव्हाणने यापूर्वी चामरलेणीवर यशस्वी चढाई केलेली होती; आणि त्याच अनुभवाच्या जोरावर ती कळसूबाईच्या मोहिमेत अंजनासोबत सहभागी झालेली होती. चढाईदरम्यान अनेक ठिकाणी तिला दोन-तीन जणांचा आधार घ्यावा लागत होता. तशा बिकट परिस्थितीतही तिने कळसूबाई शिखरावर ३० टक्क्यापर्यंतची चढाई पार पाडली. चि. रूद्र बलकवडे याला याआधी चढाईचा दाना काहीच अनुभव नव्हता. तरीही त्याने जिद्दीच्या बळावर अंजनासोबत महाराष्ट्राच्या या अत्युच्च टोकावर आपली पावलं उमटविण्यात यश मिळवले. ही मोठीच कौतकाची बाब होय !
अंजनाच्या कळ सूबाई शिखरावरील या आठव्या मोहिमेत 'सक्षम' च्या ६३ ते ७८ वयाच्या ॥ बारा ज्येष्ठ सदस्यांनी सहभाग नोंदवला. त्यापैकी चार-पाच जण अंजना व रूद्र यांच्या समवेत शिखरावरील कळसूमातेच्या देवळापर्यंत जाऊ शकले, तर इतराना ३० ते ६० टक्के अंतरापर्यंत चढाई न करण्यात यश मिळवता आले. रूद्रच्या मातुल कुटुंबातील म्हणजे घोरपडे परिवारातील आठ जणांनादेखील शिखराच्या टोकावर जाण्यात यश मिळवता आले. वयाचा विचार करता 'सक्षम' सदस्यांनी या मोहिमेत जी रूची दाखवली ती निश्चितच प्रशंसनीय होती. कु. अंजना हिला प्रोत्साहन मिळून तिने तिचे नियोजित ध्यय गाठण्यात यश मिळवावे या हेतूनेच या ज्येष्ठ सदस्यांनी हे धारिष्टा केले होते असे म्हणण्यास प्रत्यवाय नाही. विकलांग व्यक्तीद्वारा कळसूबाई विकलांग व्यक्तीद्वारा कळसूबाई या महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखरावर अकरा वेळा चढाईचा हा विश्वविक्रम आपल्या नावे करण्यासाठी अंजना हिने 'वंडर बुक, लंडनया संस्थेकडे नियोजित शुल्क भरून नोंदणी केलेली आहे. हा खर्च सक्षम' संस्थेतर्फे करण्यात आलातर मोहिमांच्या इतर खर्चासाठी व्यवस्थेसाठी 'सक्षम' संस्थासरस्वती समूह संस्था आणि गरुडझेप प्रतिष्ठान संस्था यानी सहयोग दिला. कु. अंजनाच्या आगळ्या वेगळ्या होऊ घात असलेल्या विश्वविक्रमासाठी तिला मनापासून शुभेच्छा !