कल्याण प्रतिनिधी : दरवर्षीप्रमाणे पासी देखिल कल्याण पश्चिमेकडील गांधी चौक, शिवसेना शाखेने प्रफुल्ललाशेठ गवळी (विभाग प्रमुख) व राजेश महाले (शाखा प्रमुख) यांच्या मार्गदर्शनाखाली दि. २३ जानेवारी ते दि. २७ जानेवारी २०२० या काळात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून भगवा सप्ताह अपार उत्साहात नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसादात साजरा केला. दि. २० जानेवारी ते दि. २३ जानेवारी या काळात शाखा कार्यालयात ज्येष्ठ नागरिकाडून (ज्येष्ठ नागरिकांच्या दाखल्यासंदर्भात) संबंधित फॉर्म तथा आवश्यक कागदपत्रे जमा केलीत. दि. २३ जानेवारी २०२० रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस व हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी दिवसभर शिवसैनिक तथा असंख्य नागरिकांनी शाखा कार्यालयात येऊन या दोन महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करन त्यांच्या पुढे नतमस्तक होत त्यांना विनम्र अभिवादन केले. - दि. २६ जानेवारी रोजी सायं. ५.३० च्या सुमारास शिवसैनिक तथा अनेक नागरिकांच्या उपस्थितीत भारत मातेच्या प्रतिमेचे पुजन करून भारत मातेची आरती करण्यात आली.
त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांना (ज्येष्ठ नागरीकत्वाचे) दाखले वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी आर.एस.एस. चे ज्येष्ठ नेते प्रवीण देशमुख, कल्याण वैभवचे संपादक विश्वास दुळकर्णी व क्ल्याणमधील नामवंत डॉ. गोडबोल व त्याचबरोबर शिवसेनेचे ज्येष्ठ स्थानिक नेते उमाकांत महाजन व देवेंद्र सोनवणे यांना व्यासपीठावर पाचारण करण्यात आले. त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्रविण देशमुख व विश्वास कुळकर्णी यांनी आपल्या मनोगतात शिवसेना शाखेच्या दरवर्षी ज्येष्ठ नागरिकांना शाखा कार्यालयातून दाखले उपलब्ध करून देण्याचा या व इतर लोकोपयोगी उपक्रमांचे कौतुक केले व या शाखेचे प्रमुख श्री. राजेश महाले अत्यंत तळमळीने, निरपेक्ष भावनेने करत " असलेल्या कार्याचा व त्यांना तोलामोलाची साथ देणाऱ्या त्यांच्या दाइकरसहकार्याचा गौरव केला. या संपूर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शाखाप्रमुख राजेश महाले यांनी परिश्रम केले. प्रातिनिधीक स्वरूपात काही ज्येष्ठ नागरिकांना मान्यवरांच्या हस्ते दाखल्यांचे वाटप करण्यात आले. त्यानंतर महिलांच्या हळदीकुंकवाचा कार्यक्रम सुरू झाला.
या कार्यक्रमासाठी आजुबाजूच्या परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने आपली उपस्थिती नोंदवली व कार्यक्रमाची खया अर्थाने शोभा वाढवली. अशा प्रकारे हा कार्यक्रम मोठ्या गर्दीत व अपार उत्साहात संपन्न झाला. हा कार्यक्रम यशस्वी त्यांना करण्यासाठी प्रतिभा महाले, वासंती दाइकर, ममता झवेरी, नंदिनी कुळकर्णी, नयना महाजन व अन्य महिला आघाडी कार्यकर्त्यांनी विशेष | परिश्रम घेतले. | दि. २७ जानेवारी हा दिवस मान्यवरांच्या धर्मवीर गुरुवर्य आनंद दिघे यांचा | जयंती दिन. या दिवशी असंख्य नागरिकांनी शाखा कार्यालयात येऊन । धर्मवीरांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक हाऊन त्यांना विनम्र अभिवादन कल. या भगव्या सप्ताहाअंतर्गत सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाखाप्रमुख राजेश महाले यांच्यासह शाखेच्या सर्व पदाधिकारी तथा सदस्यांनी व महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली..