कल्याण प्रतिनिधी : RTI म्हणजे rights to imformation act. मराठीत माहितीचा अधिकार. या समाजासाठी चांगल्या कामासाठी तसेच नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केला गेला...अशा RTI कार्यकर्त्यांची महाराष्ट्र मधून...RTI फोरम मुंबई या संस्थेने निवड करून दि. २६/ १/२०२० रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त मुंबई येथे सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या अंतर्गत कल्याणमधील नागरी समस्यांना वाचा फोडण्यासाठी अत्यंत तळमळीने, सचोटीने कार्य करत असलेला क्रियाशील RTI कार्यकर्ता योगेश दळवी याचा सत्कार या कार्यक्रमात करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी केंद्रीय माहिती आयुक्त शैलेश गांधी, अनिल गलगली प्रसिध्द RTI कार्यकर्ते विलास तुपे निवृत्त पोलिस उपायुक्त ACB डॉ. संजय लाखे पाटील आणि RTI फोरमचे अध्यक्ष सुधाकर काश्यप यांच्याबरोबर अनेक मान्यवर प्रमुख पाहुणे | त्याचबरोबर महाराष्ट्रामधील अनेक RTI कार्यकर्ते उपस्थित होते. नंदकुमार नाईक योगेश दळवी यांचे झालेल्या सन का यशस्वी वाटचालीसाठी कल्याण वैभवतर्फे हार्दिक शुभेच्छा! .
RTI कार्यकर्ता योगेश दळवी याचा सत्कार