भाजपा महिला आघाडीतर्फे ज्येष्ठ नागरिकांना श्रवण यंत्र वाटप

 कल्याण प्रतिनिधी :भाजपा यशस्वी महिला मंडळ . युवक प्रतिशनतर्फे भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून दि. २६ जानेवारी २०२० रोजी अभिनय विद्या मंदिर सभागृहात ज्येष्ठ नागरिकांना कर्णयंत्र वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमासाठी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष किरीट सोमय्या यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. ते तसेच माजी आमदार नरेंद्र पवार तसेच भाजपच्या अन्य पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ज्येष्ठ नागरिकांना श्रवण यंत्र वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. हा कार्यक्रम भाजपच्या ठाणे-पालघर जिल्ह्याच्या महिला मोर्चा अध्यक्षा डॉ. शुभा पाध्ये यांनी आयोजित केला होता. या कार्यक्रमास अपेक्षेपेक्षा प्रचंड प्रतिसाद लाभला. हजारपेक्षा जास्त नागरिकांनी या कार्यक्रमास आपली उपस्थिती नोंदवली. या कार्यक्रमा अंतर्गत असलेला जनसमुदाय २०० लाभार्थीना पवणयंत्राचे वाटप फरमात आले व १५० लाभार्थीच्या नावांची नोंद करून त्यांना नंतर दवणयो पुरविली जाणार असल्याचे आयोजकांनी कळविले. या कार्यक्रमास एक हजारपेक्षा जास्त नागरिकांनी उपस्थिती नोंदविष्याने सभागृह अपुरे पडले. अनेक नागरिकांना सभागृहाबाहेर उभे राहून या कार्यक्रमाचा आनंद प्यावा लागला. एकूण ३५० लाभार्थीपैकी उपलब्ध असलेल्या २०० प्रवण यंत्राचे वाटप करण्यात आले व उर्वरित १५० पक्षणयो लाभार्थीना नंतर देण्याचे ठरले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भाजपाचे मोहन बागुल, महेश केळकर, राजेंद्र फडके, प्रिया शर्मा हे पदाधिकारी तसेच दत्तात्रय कुळकर्णी, दिपाली दळवी, वंदना वाणी. हेमंत पाठक तथा अनेक कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतलेत. हा कार्यक्रम सुमारे चार तास चालला.